– मातृतीर्थ सिंदखेडराजात येऊन जिजाऊ मॉसाहेबांचे घेतले दर्शन
– काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे जोरदार स्वागत
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सिंदखेडराजाच्या मातीनेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लढण्याचे बळ व विचार दिला. हाच विचार राजकारणात घेऊन पक्ष बांधणी करायची आहे, असे उद्गार काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले. आज त्यांनी राजमाता जिजाऊ मॉसाहेबांसमोर नतमस्तक होऊन त्यांना वंदन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर ते बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील संत चोखामेळा यांच्या दर्शनासाठी व त्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्माने पुनीत झालेल्या मातृत्व सिंदखेडराजा येथे जिजाऊ मॉसाहेबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही माती शौर्याची माती आहे, ही प्रेरणेची माती आहे, याच मातीने मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शासकीयस्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याची प्रेरणा दिली. आणि, हा उत्सव मी सुरू करू शकलो. लौकिक अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे भावनिक उद्गार या प्रसंगी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम बाबू उमाळकर, सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, दत्ताभाऊ काकस बुलढाणा, लोकजागर परिवाराचे मुख्य विश्वस्त प्रवीणभाऊ गीते, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेशदादा कायंदे, समाधान सुपेकर, राज्याचे सोशल मीडियाचे पदाधिकारी सुनीलभाऊ जायभाये, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, सत्यजित खरात, कलीम खान, पी. के. वाघमारे, अमोल ठाकरे, राहुल साबळे, सिद्धार्थ बेंदाडे, यासह अनेक मान्यवर तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.