खामगाव – दुचाकीने कामावर टेंभूर्णा येथून खामगावजात असतांना भरधाव ट्रकने (मिक्सर) दुचाकीला चिरडले. या अपघातात ट्रकचे चाक दुचाकी स्वाराच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १३ जून रोजी खामगाव अकोला मार्गावरील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ घडली.
खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथील गजानन रामभाऊ सातपूते वय ३७ हे खाजगी चालक आहेत. १३ जून रोजी खामगाव येथे कामावर दुचाकीने जात असतांना खामगाव अकोला महामार्गावरील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणार्या भरधाव ट्रकने (मिक्सर) क्रमांक एमएच २१ बीएच २०४२ ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला असून ट्रकचे चाक गजानन सातपूते यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच टेंभूर्णा येथील नागरिकांनी धाव घेतली. तर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्रक (मिक्सर) क्रमांक एमएच २१ बीएच २०४२ चालका विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर मृतक गजानन सातपूते यांच्या पश्चात पत्नी व २ मुली आहेत.
भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले