मेरा बु , ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) : चंदनपूर येथील जि.प. शाळेमध्ये १६ जुलै रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा सरपंच इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सभेमध्ये अविरोधपणे मनोज साळवे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
चंदनपूर येथील जि .प . शाळेत वर्ग १ ते ७ पर्यत शाळा असून मुख्याध्यापक सोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा दोन वर्षांचा कार्यकाळ आटोपल्या असल्याने शाळा व्यवस्थापन समिती पुर्नरचनेसाठी शाळेत सर्व विद्यार्थी पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती . शाळा समितीची निवड होणार म्हणून गावातील हाैसे-नवसे पुढाऱ्यांनी शाळेत उपस्थिती लावली होती. आपल्या पार्टीचा अध्यक्ष व्हावा यासाठ सर्वजण ताकतीने मैदानात उतरले होते . ही समिती ग्रा.प. सरपंच गजानन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . समितीची निवड शांततेत पार पडावी यासाठी शाळा व्यवस्थापनाने ज्या पालकांचा पाल्य ज्या वर्गात आहे त्याच वर्गखोली मध्ये आलेल्या सर्व पालकांना बसविण्यात आले . त्यामुळे पुढारी मंडळींचा हिरमोड होवून गेला. मुख्याध्यापकाने परिस्थिती पाहून शाळेच्या सर्व शिक्षकाकडे वर्ग खोलीमधील पालकांची जबाबदारी देवून पालकांना वर्गखोली मध्ये बसविले आणि वर्ग खोलीमध्येच शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमानुसार सदस्यांची निवड केली . असे एकूण सात सदस्य निवडण्यात आले . आणि निवडलेल्या सात सदस्यांमधून सर्व सदस्यांनी अविरोधपणे मनोज शंकर साळवे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली . समितीचे कामकाज मुख्याध्यापक सोरमारे यांनी पाहिले तर सभेला ग्रा.प. सरपंच गजानन इंगळे , उपसरपंच विठ्ठल इंगळे तथा सर्व सदस्य उपस्थित होते. समितीच्या अध्यक्षपदी मनोज साळवे यांची निवड झाल्याने शाळेबाहेर नागरिकांनी गुलाल व फटाके फाडून आनंद साजरा केला. अध्यक्ष निवडी बद्दल सर्व गावकऱ्यांना चहा नास्ता वाटप करण्यात आला .