जगदीप धनखड एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
– सद्या पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर केले आहे. दिल्ली येथे झालेल्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह प्रमुख नेते हजर होते.
जगदीप धनखड हे राजस्थानातील जाट समुदयाचे नेते आहेत. त्यांना २०१९ मध्ये भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवले होते. १९८९ ते १९९१ दरम्यान ते राजस्थानातील झुंझनू लोकसभा मतदारसंघातून खासदार होते, त्याच काळात ते व्हीपी सिंह व चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीदेखील होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यपाल धनखड यांच्यात अनेकवेळा संघर्ष झडला आहे.
—
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी १९ जुलै ही नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असून, ६ ऑगस्ट रोजी मतदान आहे. तर ११ ऑगस्टला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
—————–