Breaking newsBULDHANAChikhaliHead linesVidharbha

रामनगर फाट्यावर भीषण अपघात; एक प्रवासी जागीच ठार, तिघे अत्यवस्थ!

– साखरझोपेतच एसटी बसमधील प्रवाशावर काळाचा घाला; जखमींवर चिखलीत उपचार सुरू!

चिखली (कैलास आंधळे) – चिखली ते देऊळगावराजा महामार्गावरील रामनगर फाट्याजवळ पुण्याहून शेगावकडे येणार्‍या शयनयान एसटी बस आणि मालवाहू ट्रकची भीषण धडक झाल्याने झालेल्या अपघातात बसमधील एक प्रवासी जागीच ठार झाला असून, तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजक आहे. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखली येथील ग्रामीण व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि.९) पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्देवाने मृत्युमुखींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जालना- चिखली मार्गावर आज भल्यापहाटे ओव्हर टेकच्या नादात समोरील ट्रकला पुणे-शेगाव एसटी बसची धडक बसून हा भीषण अपघात झाला आहे. यात खामगाव येथील एक प्रवासी जागीच ठार झाला तर, तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. अंढेरा फाटानजीक असलेल्या रामनगर फाट्यावर ही दुर्देवी घटना घडली. जखमी प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरला हलविण्याची शक्यता आहे. तर किरकोळ जखमींवर चिखली येथील खासगी रूग्णालयात व ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पुण्यावरून शेगावला ही बस येत होती. रामनगर फाट्याजवळ साखरेचे पोते भरलेल्या ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या नादात भरधाव बसने ट्रकच्या मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. ट्रक अचानक लेन सोडून आल्याचे दिसून येत असून, त्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व सहकारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व गंभीर जखमींना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चिंताजनक प्रकृती बनलेल्या प्रवाशांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या अपघाताची माहिती मिळताच अंचरवाडी, रामनगर, मेरा खुर्द येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचावकार्य सुरू केले होते. यावेळी पीएसआय हरिहर गोरे व गोरख राठोड, मोंरसिंग राठोड, अरुण खार्डे, रामेश्वर आंधळे हे कर्मचारी मदतीसाठी आलेल्या तरूणांना सहाय्य व मार्गदर्शन करत होते. या बसमधून २२ प्रवासी प्रवास करीत होते. अधिक तपास अंढेरा पोलिस करत होते.


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे एसटी बस ही चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लेन सोडून आलेला मालवाहू ट्रक समोर आला. ब्रेक दाबायच्या काहीक्षणातच मालवाहू ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेला प्रवासी खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तीन प्रवासी अत्यवस्थ आहेत. अपघाताची माहिती मिळताच रामनगर येथील तरूण घटनास्थळी धावले व त्यांनी अंढेरा पोलिसांना अपघाताची माहिती दिली. याप्रकरणी अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!