– अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे होणार उद्घाटन
बिबी (ऋषी दंदाले) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून किनगावजट्टू येथील कायंदे हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शेतकर्यांच्या प्रश्नावर विविध प्रकारचे आंदोलने करून प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमातून घाम फोडणारे शेतकरी नेते माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांचे निकटवर्तीय असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचा २६ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा घडवी या संकल्पनेतून सहदेव लाड मित्र मंडळाच्यावतीने किनगाव जट्टू येथील कायंदे हॉस्पिटलसमोर २७ जानेवारीला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी युवकांनी या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन सहदेव लाड यांनी केले आहे.