नगर (प्रतिनिधी) – नगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव पुलाखाली एका अंदाजे ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, तो कुजलेल्या स्थितीत होता. या व्यक्तीच्या नातेवाईकांचा तोफखाना पोलिस शोध घेत आहेत.
बोल्हेगाव पुलाखाली हीरा पॅलेसनजीक हा मृतदेह दिनांक १४ नोव्हेंबररोजी आढळून आला असून, पोलिसांनी त्याचे १५ नोव्हेंबररोजी शवपरीक्षण करून डॉक्टरांनी व्हीसेरा राखीव ठेवला आहे. या अनोळखी इसमाचे वय अंदाजे ५५ वर्षे असून, रंगाने काळासावळा आहे. तर उंची १६५ सेंटिमीटर असून, अंगात पांढरे रंगाचे चौकडी हाफ शर्ट आहे. तसेच, पिवळसर रंगाची फुलपँट आहे. तोंडाचा भाग कुजलेला होता. हा इसम बेवारस स्थितीत कुजलेल्या व उताण्या स्थितीत बोल्हेगाव पुलाखाली दिसून आला. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजि. नंबर १६७/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद घेण्यात आली असून, हेडकॉन्स्टेबल गोपीनाथ गोरडे हे अधिक तपास करत आहेत. या इसमाची कुणाला माहिती असेल अथवा कुणी नातेवाईक असेल तर त्यांनी ८९७५१६२९७७ या मोबाईल क्रमांकावर तसेच तोफखाना पोलिस ठाणे ०२४१-२४१६११८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी गोपीनाथ गोरडे यांनी केले आहे. हा इसम पुलावरून खाली पडला की काही घातपात आहे, याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे.
मृतदेहाच्या शर्ट कॉलरवर जीडी क्रीएशन, वाशीचा लोगो
या मृतदेहाच्या शर्ट कॉलवर जीडी क्रीएशन वाशी, असा लोगो असून, त्यावर २७८२४८६५ असा फोन नंबर नमूद केलेला आहे. कॉलर लोगोच्या आधारे तपास करण्याचे आव्हान आता तोफखाना पोलिसांपुढे आहे. तरी अशा व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असेल तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
———-
———-
