गडचिराेली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – आलापली ते भामरागड या मुख्य मार्गावर कुमरगुंडा नाल्याचे बांधकाम यंदाचा पावसाळा तोंडावर असताना सुरू करण्यात आले. त्यासाठी तात्पुरता वळण मार्गांची निर्मिती करून वाहन जाण्या – येण्यासाठी रपटा बांधकाम करण्यात आले होते. मात्र तेही निकृष्ठ दर्जाचा असल्यामुळे या पावसात रपटा वाहून गेले. परिणामी, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
कंत्राटदारांनी कामाची सुरुवात करून नागरिकांना अडचणीत आणले आहे व या परीसरातील प्रवाशांचे हाल बिकट झालेले आहे. अजून ऊर्वरित तीन महिने पावसाळा असून नागरिकांचे हाल काय होईल आणि भामरागड तालुक्याशी संपर्क किती वेळा तुटणार हे देवालाच माहीत असल्याचे चर्चेला ऊत आला आहे. हा रपटा वाहून गेल्याची माहिती मिळताच भामरागड तालुक्याचे तहसीलदार अनमोल कांबळे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व रस्ता पूर्वरत सुरू करण्याचे निर्देश दिले.