– तीन ठिकाणी हाडे तुटली, औषधांच्या ओव्हरडोसमुळे प्रकृती आणखीच खालावली – तेजस्वी यादव
– लालूंच्या प्रकृतीसाठी बिहारमध्ये ठीकठिकाणी प्रार्थना
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांची तब्येत काल रात्रीपासून कमालीची बिघडली आहे. ते सद्या अत्यवस्थ असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगरानीखाली दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सद्या शरीर काहीही साथ देत नसल्याने डॉक्टरांची टीम परेशान आहे. तर तीन ठिकाणी हाडे तुटलेली असून, औषधांच्या ओव्हरडोसमुळे प्रकृती आणखीच खालावली असल्याचे त्यांचे पुत्र तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले.
पडल्यामुळे लालूप्रसाद यादव यांना दुखापत झालेली असून, गेली काही दिवस त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. परंतु, काल रात्रीपासून त्यांची तब्येत प्रचंड खालावली असून, शरीर कसलाही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे बिहारसह देशाच्या विविध भागात त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीदेखील आपल्या या जुन्या सहकार्याची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
Leave a Reply