बुलढाणा (प्रतिनिधी) – ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत असेल, अशा ठिकाणी ग्राहक संरक्षण समितीचे पदाधिकारी त्यांना ग्राहक मंच यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ग्राहकाशी निगडित असणार्या या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा विधी सल्लागारपदी कवयित्री तथा विचारवंत आता सिंदखेडराजा येथील प्रसिद्ध विधीतज्ञ अॅड. वर्षाताई कंकाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
आपल्यावर जी जबाबदारी सोपाविण्यात आली आहे, त्या जबाबदारीला आपण नक्कीच न्याय देऊ. तसेच, ग्राहकांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना अॅड. वर्षाताई कंकाळ यांनी सांगितले.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ परिवाराच्यावतीने अॅड. कंकाळ यांचे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, संपादक हेमंत चौधरी, संपादिका सौ. प्राची मानकर-कुलकर्णी, पश्चिम विदर्भ संपादक प्रताप मोरे, कार्यकारी संपादक प्रशांत खंडारे, सिंदखेडराजा-देऊळगावराजा विशेष प्रतिनिधी सचिन खंडारे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
