Breaking news

संतप्त शिवसैनिकांनी रनाळ्यात एकनाथ शिंदेंच्या पुतळा जाळला

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी)- शिवसेनेचे नगरविकास मंत्री बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे रविवारी रनाळे येथे दहन करण्यात करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत बंडखोरांच्या निषेध केला.

 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने छेडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दीपक गवते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रनाळे येथील बाजार चौकात रविवारी सायंकाळी संतप्त झालेल्या शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या धिक्कार करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी ‛गद्दारांचे करायचे काय खाली डोके वरती पाय’, ‘धिक्कार असो धिक्कार असो एकनाथ शिंदे यांच्या धिक्कार असो’, ‘जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

 

*गद्दारांना घरी पाठवू*

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. बंडखोर एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्यांना शिवसैनिक घरी पाठवल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत. रिक्षाचालका पासून ते मंत्री पदापर्यंत शिवसेनेने एकनाथ शिंदेंना मोठं केलं परंतु, ते आता शिवसेनेशी गद्दारी करीत आहे. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माफ करणार नाही अशी संतप्त भावना जिल्हा समन्वयक दीपक गवते यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!