BULDHANAVidharbha

विद्यार्थ्यांच्या शिक्षण व व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो – ठाणेदार भोरकडे

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – देशाला आर्थिक महासत्ता व प्रभावी राष्ट्र बनविण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा मूलभूत पाया शाळेतच रसला जातो. शाळेत मिळणार्‍या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते, असे प्रतिपादन धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी केले.

वाढदिवस किंवा इतर कोणताही कार्यक्रम आयोजित नसतांना धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार भोरकडे यांनी स्वखर्चाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांची अभ्यासिका व मुलिंच्या अभ्यासिकेला त्यांच्या गरजा जाणून घेत, पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचा संच समाजासाठी काही देणं लागते ही सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या कर्तव्य भावनेतून कसलाही गाजावाजा न करता, जवळपास १८ ते २० हजाराची स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली. एरवी राजकीय, सामाजिक नेते, कार्यकर्ते किंवा अधिकारी आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतात. मात्र ठाणेदार भोरकडे यांनी उदार अंतकरणाने अभ्यासिकेला पुस्तके भेट देऊन समाजाप्रती सहानुभूती निर्माण केली.

पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची बैठक आयोजित केली असता. त्या बैठकीनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने ही पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रविशंकर शेठ मोदे ,किशोर शेठ मोरे, सरपंचपती अलीम कुरेशी, अ‍ॅड. वसीम कुरेशी, गजानन घोंगडे, धनराज महाजन, रशिद पटेल ग्रा.पं.सदस्य कलीम कुरेशी, सुरेश बावस्कर,कलीम टेलर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, व्यवस्थापन, धेय्य,नियोजन, कशा प्रकारे करावे व आपली प्रगती कशी साधावी ह्या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या स्पर्धा परीक्षा पुस्तकांची गरजू विद्यार्थ्यांना निश्चितपणे मदत होईल असेही सांगीतले.

ठाणेदार भोरकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणार्‍या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी स्वराज्य निर्माण कशा पद्धतीने केले व सर्वधर्म समावेशक राज्य कशा पद्धतीने चालवुन जगापुढे आदर्श निर्माण केला, असल्याचे सांगितले. ह्यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी व गावांतील नागरिक, पत्रकार बांधव, पोलीस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर व आभार गजनान घोंगडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!