बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तिसऱ्यांदा चांगल्या मताधिक्क्याने विजयी होऊनही, आमदार संजय रायमुलकर यांना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदापासून वंचित ठेवले होते तद्नंतर त्यांची पंचायत राज कमेटीवर नियुक्ती करून त्यांची बोळवण करण्यात आली होती. विशेष म्हणजे बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातील शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख दोन्ही खासदार आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार संजय रायमुलकर यांना मंत्रीपद देण्यासाठी शिफारस केली होती मात्र त्यातही फायदा आला नव्हता व ऐनवेळी आदित्य ठाकरेंचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला होता त्यामुळे खासदार प्रतापराव, यांच्यासह तिनही जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. तेव्हा पासूनच आमदार रायमूलकर नाराज होते मात्र त्यांनी आपली नाराजी कधी उघड केली नाही
शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांनाही आ संजय रायमुलकर यांना पेनटाकळी प्रकल्प, समृद्धी महामार्गाच्या यासह विविध समस्यांबाबत आमरण उपोषण, विविध आंदोलने करावी लागत होती. शिवसेना मुळात आंदोलनातून निर्माण झालेले राजकीय पक्ष मात्र महाराष्ट्रात सत्तेत असतांनाही व शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांनाही मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांना पेनटाकळी प्रकल्प असो की स्व बाळासाहेब ठाकरे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या शेती, रस्त्याच्या कामासाठी आंदोलन आमरण उपोषण करावे लागली तेव्हा त्यांची नाराजी हेरुन ना एकनाथ शिंदे यांनी आ संजय रायमुलकर यांना जवळ केले व आपल्या गटात सामील करून घेतले.
आ संजय रायमुलकर यांच्या मुलीच्या लग्नात सुद्धा ना एकनाथ शिंदे मेहकरला आले होते आमदार संजय रायमुलकर मेहकर तालुका प्रमुख होते तेव्हा त्यांनी अनेक आक्रमक आंदोलने केलीत आंदोलनात्मक मुशितून तयार झालेला हा नेता मात्र सत्ता असतांनाही आंदोलन करावि लागत असल्याचे त्यामुळे वेगळा संदेश जात आहे प्रश्न जैसे थे आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघ खासदार प्रतापराव जाधव यांचा ३० वर्षांपासून बनलेला बालेकिल्ला. २००९ च्या पुर्नरचनेत तो अनुसूचीत जातीसाठी राखीव झाल्यानंतर, प्रतापराव जाधव लोकसभेच्या प्रांगणात आले व खासदार झाले व संजय रायमुलकर यांना विधानसभा निवडणूकीत प्रतापरावारांनीच उतरवले व तीन वेळा आमदार संजय रायमुलकर चांगल्या मताधिक्याने विजयी झाले खा प्रतापराव जाधव यांनी २००८ ला संजय रायमुलकर यांना त्यांना उमेदवारी दिली. अन् तालुका प्रमुख ते संजय रायमुलकर हे तिन वेळा आमदार झाले. आमदार झाल्यावर संजय रायमुलकर मात्र शिवसेना सत्तेत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतांनाही त्यांनी मागच्या वर्षी पेनटाकळी धरणात मारलेली उडी, ही राजकारणात बहुचर्चीत यासाठी ठरली आहे की. राज्यात त्यांचेच सरकार असतांना त्यांना काम करुन घेण्यासाठी चक्क उडी मारण्याचे आंदोलन का करावे लागले? आतातर सत्ता असतांनाही त्यांचे सर्वेसर्वा नेते खा.प्रतापराव जाधव हे तिन वेळा आमदार, २ वेळा मंत्री खासदार झाले. तर रायमुलकर यांचीही ही आमदारकीची तिसरी टर्म सुरु आहे, तरीही त्यांना पेनटाकळीच्या कालव्याचा व इतर समस्या जैसे थे आहे. त्यामुळे आमदार संजय रायमुलकर नामदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झाले आहेत.