– शिवसेना आमदारांचे बंड आता विधानसभेच्या आखाड्यात!
– उपाध्यक्षांनी सांगितले, काही आमदारांच्या सह्या जुळत नाहीत, नेमके आमदार किती?
– मंत्री दादा भुसेंसह सात आमदार गुवाहाटीकडे रवाना
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना बंडखोरांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय घेत, आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यास तयार आहोत. तुम्ही चोवीस तासाच्याआत परत आलात तर असा निर्णय घेतला जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा शिवसेना नेते तथा मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केली. शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्षा बंगल्यावर पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. या बैठकीला २२ आमदार हजर होते, त्यातील दोघे ऑनलाईन हजर राहिले, या बैठकीतील सूत्राने सांगितले आहे. दुसरीकडे, शिवसेना आमदारांचे बंड आता विधानसभेच्या राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. संवैधानिक पेच आणि डावपेच वापरले जाण्याची शक्यता असून, वेळप्रसंगी हे बंडखोर कोर्टातही जाण्याची शक्यता आहे. काल बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ३४ शिवसेना आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांसह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले होते. त्या पत्रातील सह्यांवर उपाध्यक्षांना संशय असून, तसे त्यांनी लेखी स्वरुपात एकनाथ शिंदे यांना कळवले आहे.
एकीकडे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत पुनर्विचार करण्याचे सूतोवाच केले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, हा राजकीय पेच सुटेपर्यंत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असे बंडखोरांना ठणकावले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दादा भुसे हेदेखील शिंदे यांना सहभागी होण्यासाठी गुवाहाटीला पोहोचले आहेत.
विधानसभेचे अध्यक्षपद सद्या रिक्त आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोरांचे काय करायचे याचा निर्णय झिरवळच घेणार आहेत. त्यामुळे काल शिंदे यांनी ३४ शिवसेना आमदारांच्या समर्थनाचे पत्र पाठवले असता, त्यातील काही आमदारांच्या सह्या विधानसभेच्या रेकॉर्डनुसार जुळत नाही, असे झिरवळ यांनी शिंदेंना कळवले आहे. त्यांच्या या भूमिकेने बंडखोरांना मोठा धक्का बसला आहे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांनी धक्कादायक आरोप केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र सरकार पाडण्याची घातक खेळी भाजपने खेळली आहे. परंतु, त्यांचा इरादा यशस्वी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत असून, जे सुरु आहे तो शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, असेही खारगे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार
१) एकनाथ शिंदे
२) अनिल बाबर
३) शंभूराजे देसाई
४) महेश शिंदे
५) शहाजी पाटील
६) महेंद्र थोरवे
७) भरतशेठ गोगावले
८) महेंद्र दळवी
९) प्रकाश अबिटकर
१०) डॉ. बालाजी किणीकर
११) ज्ञानराज चौगुले
१२) प्रा. रमेश बोरनारे
१३) तानाजी सावंत
१४) संदीपान भुमरे
१५) अब्दुल सत्तार नबी
१६) प्रकाश सुर्वे
१७) बालाजी कल्याणकर
१८) संजय शिरसाट
१९) प्रदीप जयस्वाल
२०) संजय रायमुलकर
२१) संजय गायकवाड
२२) विश्वनाथ भोईर
२३) शांताराम मोरे
२४) श्रीनिवास वनगा
२५) किशोरअप्पा पाटील
२६) सुहास कांदे
२७) चिमणआबा पाटील
२८) सौ. लता सोनावणे
२९) प्रताप सरनाईक
३०) सौ. यामिनी जाधव
३१) योगेश कदम
३२) गुलाबराव पाटील
३३) मंगेश कुडाळकर
३४) सदा सरवणकर
३५) दीपक केसरकर
३६) दादा भुसे
अपक्ष आमदार
१) बच्चू कडू
२) राजकुमार पटेल
३) राजेंद्र यड्रावकर
४) चंद्रकांत पाटील
५) नरेंद्र भोंडेकर
६) किशोर जोरगेवार
७) सौ.मंजुळा गावित
८) विनोद अग्रवाल
९) गीता जैन
मंत्री दादा भुसेंसह सात आमदार गुवाहाटीकडे रवाना
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दादा भुसे यांनीदेखील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरवले आहे. त्यांच्यासह रविंद्र फाटक, संजय राठोड, विनोद वाघ, सुनील देवरे, सचिन जाधव, व श्रीमती सोनिया वर्मा हे आमदार आज गुवाहाटीकडे रवाना झाले. त्यांचे विशेष विमानाचे तिकीटच ब्रेकिंग महाराष्ट्रला प्राप्त झालेले आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांनी धक्कादायक आरोप केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र सरकार पाडण्याची घातक खेळी भाजपने खेळली आहे. परंतु, त्यांचा इरादा यशस्वी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत असून, जे सुरु आहे तो शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, असेही खारगे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.