आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जल जीवन मिशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत ग्रामपंचायत चऱ्होली खुर्द,, मरकळ, गोलेगाव – पिंपळगाव, वडगाव घेनंद या चार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आणि खेड तालुक्याचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाले.
यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती अरुण चौधरी, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, शिवसेनेचे पुणे जिल्हा माजी प्रमुख डॉ. राम गावडे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य दिपाली काळे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदासशेठ ठाकूर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी नगरसेवक भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती बाळासाहेब ठाकूर, संचालक सयाजीराव मोहिते, प्रतिक मोहिते, मयूर शेठ मोहिते, वकील सेल खेड तालुका अध्यक्षा मनीषा टाकळकर, सरपंच चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत आशा थोरवे, सरपंच वडगाव घेनंद शशिकला घेनंद, सरपंच गोलेगाव अमित चौधरी, मरकळ अमोल लोखंडे, उपसरपंच पांडुरंग थोरवे, विठ्ठल थोरात, बेबीताई चौधरी, नयना वर्पे, आळंदीचे युवानेते अनिकेत कुऱ्हाडे यांच्यासह खेड तालुक्यातील विविध विकास कार्यकारी सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य, ग्रामपंचायतचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती, बाजार समिती, माजी सभापती, उपसभापती, संचालक, सदस्य, आळंदी पंचक्रोशीतील विविध गावातील संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार रोहितदादा पवार, आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, खेड पंचायत समिती संभापती अरुण चौधरी, चऱ्होली खुर्द गावचे सरपंच आशा थोरवे, उपसरपंच पांडुरंग थोरवे यांचा आळंदी पंचक्रोशीतील ग्रामस्थानचे वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार डीईप मोहिते पाटील यांनी यावेळी खेड तालुक्याचे विकास कामांचा आढावा घेत सुमारे ५८० कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करून घेत विकास साधला असून या पुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विकासास डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आळंदीसह पंचक्रोशी आणि खेड तालुक्यातील विविध केलेल्या तसेच सुरु होत असलेल्या कामांची यावेळी त्यांनी माहिती देत विरोधक न केलेल्या कामांचे श्रेय घेत असल्याचे सांगत कोणाचेही नाव न घेता टीका केली. यावेळी तीर्थक्षेत्र आळंदी देहू येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे खूपच प्रदूषण वाढल्याचे सांगत पिण्याचे पाणी पुरवठा योजनांना आपण प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. धरणे खेड मध्ये पुनर्वसन खेड मध्ये आणि पाणी खेड तालुक्याचे बाहेर जात असल्याचे धोरणावर देखील त्यांनी यावेळी टीका केली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी आपण खेड मध्ये येऊन निवडणूक लढविणार नसल्याचे सागंत आपण जामखेड मध्येच कायम काम करणार असून राज्यातील विकास साधणार असल्याचे सांगितले. यावेळी थोरपुरुष, राष्ट्रीय नेते यांचेवर राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्यांचे नंतर त्यांचेवर कारवाईला विलंब झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत टीका केली. राज्यात आलेले सरकार हे गटाचे असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांनी खेड मध्ये केलेल्या विकासाची आठवण ठेवत यापुढील काळात अधिक विकास होण्यासाठी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी चऱ्होली ग्रामपंचायत सद्स्य कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे इकचुक उमेदवार अनिकेत कुऱ्हाडे यांचे वतीने आमदार महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच उपस्थित मान्यवरांचे हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह असलेल्या घड्याळचे अनावरण करीत उपस्थितांना भेट देण्यात आले.