Aalandi

आळंदीत कीर्तनातून राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगरपरिषद यांच्या वतीने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे रविवारी ( दि. १२ ) सकाळी परंपरेने कार्यक्रम झाला. यावेळी ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांची कीर्तन सेवा झाली. या प्रसंगी गांधीवादी कार्यकर्ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार, काँग्रेस नेते नंदकुमार वडगावकर, तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दत्तात्रय महाराज बोरकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, डॉ प्रवीण सप्तर्षी, संदीप बर्वे, कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळ अध्यक्ष देवराम घुंडरे पाटील, विश्वस्त ज्ञानेश्वर धुंडरे, राजेश घुंडरे, लक्ष्मण मेदनकर, बाळकृष्ण आरू, आळंदी नगरपरिषद विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के, भानुदास सात्रस, भारत दास, सुदर्शन चखाले, प्रा. नीलम पंडित, दीपक मोहिते, शाम तोडकर, वारकरी संस्थांचे विद्यार्थी, महिला टाळकरी, बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक – युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक उपस्थित होत्या. खादीची शाल, विनोबा भावे लिखित ‘ज्ञानेश्वरांची भजने’ आणि डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ ही पुस्तके देवून शामसुंदर महाराज सोन्नर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी राजाभाऊ रंधवे चोपदार यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून रक्षा विसर्जन स्थळ स्मारकास पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले. सुत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले.

राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण ‘

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छे नुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणी मध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीत १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. नित्य नेमाने दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे राष्ट्रपिता गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७५ वर्ष ही परंपरा सुरु आहे. कीर्तन सेवेतील जयघोषात आळंदी येथे ‘ राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण साजरे झाले. यावेळी शामसुंदर महाराज सोन्नर यांनी संविधानातील लोकशाही मूल्यांवर आधारित किर्तन सेवा रुजू केली. आळंदी नगरपरिषद, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आळंदी गांधी भवन यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!