– नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील वारकर्यांचा समावेश
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – मागी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर आणि आमटी खाल्ली त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. ही माहिती मिळताच आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी संबंधित आरोग्य विभागाला त्वरीत उपचार करण्याच्या सूचना दिल्या. बाधित झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटेपासून पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.
मंठा ते पंढरपूर अशी दिंडी मागील २५ वर्षापासून येते. या दिंडीत भाविक नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील लोक १८५ च्या आसपास पायी चालत येतात. यंदा मागी यात्रा सोहळा साजरा करण्यासाठी दिंडी ३१ जानेवारी २०२३ रोजी पंढरपुरात आली. पंढरपुरातील एका सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला. या भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर आणि आमटी खाल्लेली होती. परंतु त्यांना गुरुवारी पहाटेच्या सुमारास मळमळ व उलट्या चक्कर चा त्रास सुरू झाला. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी गांभीर्य ओळखून तात्काळ १०८ रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था केली. संबंधित १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्याच्या सूचना दिल्या व स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे व त्याची टिम हे रुग्ण तपासून उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. आता सर्वांची परिस्थिती चांगली असून सर्व रुग्ण उपचार करून घरी पाठवण्यात आलेले आहे. यामध्ये बाह्यरुग्ण ४८ (पुरुष ३० व १८ महिला) तपासणी करण्यात आली होती. आंतरूग्ण म्हणून ८९ दाखल करण्यात आले होते. (पुरुष ६७ व महिला २२) हे सर्व नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होते.
यावेळी अन्नामुळे विषबाधा झाल्याने अन्नाचे नमुने तपासणी पाठवण्यात आलेले होते. अशा घटना परत घडू नये यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यासाठी दिंडी प्रमुखांना सुचना देण्यात आले. प्रामुख्याने अन्न योग्य पद्धतीने शिजवणे, पाणी योग्य पद्धतीने घेणे, अन्न शिजवण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता किचन कर्मचारी, आरोग्य विभाग ने वेळेत दक्षता घेतल्याने पुढील अनर्थ टाळला. या टीम मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोलले, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर डॉ. महेश कुमार माने, वैद्यकिय अधिकारी खर्डी, डॉ अस्मिता चव्हाण, आरोग्य सेविका सुरेखा जवळकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी गायकवाड, आरोग्य सेवक प्रकाश बिराजदार, आरोग्य सेविका वंदना लोखंडे व आशा यांनी परिश्रम घेतले.