बुलड़ाणा (जिल्हा प्रतिनिधी) – कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने येथील जिजामाता प्रेक्षागार येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन १० ते १४ जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे.
या कृषी महोत्सवाचे उदघाटन १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते होणार असून, खा.प्रतापराव जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. खा.रक्षाताई खड़से, आ. वसंत खंड़ेलवाल, आ. ड़ॉ. राजेन्द्र शिंगणे, आ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, आ. राजेश एकड़े, आ.किरण सरनाईक, आ.धिरज लिंगाड़ें, आ. संजय कुटे, आ. आकाश फुंड़कर, आ. श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी ड़ॉ. ह. पि. तुम्मोड़, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड़, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृषधान्य वर्ष २३ अंतर्गत खुली पाककला स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली आहे. महोत्सवादरम्यान ड़ॉ. प्रशांत नाईकवाड़ी, ड़ॉ. संतोष चव्हाण, ड़ॉ. सुभाष टाले , ड़ॉ. प्रणिती कड़ु, शाम गट्टाणी, महेंन्द्र ढवळे, संदीप शेळके, संजय वाघ,़ डॉ. योगेश इंगळे, श्रीमती के. सि. गांगळे , ड़ॉ. सि. पि. जायभाये आदिंचे विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे. सदर महोत्सवात शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, स्वयंसहाय्यता बचत गट व शेतकरी यांनी उत्पादीत केलेल्या मालाची प्रदर्शनी व विक्री करण्यात येणार आहे. तरी कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी केले आहे.