बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) भरधाव कंटेनरने काळी पिवळीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ महिला ठार तर ४ जण जखमी झाल्याची घटना मेहकर चिखली मार्गावर शीतला माता मंदिराजवळ आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. चिखली कडून भरधाव वेगाने येणारा कंटेनर क्रमांक टी एस ०१-यु सी ०७५५ ने मेहकर वरून साखरखेर्डा येथे जाणाऱ्या काळी पिवळी गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात पंचफुला आनंदा दुतोंडे वय ६२,यशोदा नारायण गवई वय ३५ दोघी राहणार उसरण ता.मेहकर या ठार झाल्या. तर ललिता सचिनसिंग ठाकूर वय ३० रा. साखरखर्डा यांचा एका हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे तर नारायण सूर्यभान गवई वय ४० रा. उसरन यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे. शारदा गजानन तुपकर वय ३६ रा.गुंज यांचेवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रीती देवेंद्र ठाकुर वय ३० रा. साखरखेर्डा यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.