BULDHANAChikhaliHead linesMaharashtraMumbai

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या निधीत दुपटीने वाढ करणार!

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यांतील लाखो संघटीत कामगारांच्या कुटुंब आणि पाल्यांसाठी कल्याणासाठी वापरण्यात येणार्‍या आणि कामगार , मालक आणि शासन असे त्रिसदस्यीय जमा होणार्‍या निधीत दुपटीने वाढ करण्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या आस्थपनेतील कामगारांच्या विविध मागण्यांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत दिले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या आस्थपनेतील कामगारांच्या विविध मागण्यांबाबत मुंबई येथे मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. सदर बैठक घेण्याबाबत आ. सौ श्वेताताई महाले पाटील यांनी पत्र दिलेले होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई कामगार कल्याण मंडळ, अस्थपनेतील कार्यरत अर्ध वेळ कर्मचारी यांचे ८ वर्षा पासून प्रलंबित असलेले मागण्या पूर्ण होण्यासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कडे आ. सौ. श्वेताताई महाले यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या निधीत दुपटीने वाढ होणार असल्याने कामगार कल्याण निधी १९५३ नुसार येणार्‍या सर्व आस्थापना, एसटी महामंडळ, सर्व महामंडळ, सहकारी बँक, सहकारी सूत गिरणी, सहकारी पतसंस्था, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० अंतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना फॅक्टरी अ‍ॅक्ट १९४८ नुसार येणारे सर्व उद्योग ,सर्व एमआयडीसी उद्योग, आणि ज्या आस्थापनेत ५ पेक्षा जास्त कामगार काम करतात अशा सर्व आस्थापनामध्ये काम करणार्‍या कोट्यावधी कामगारांना, त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे. या निधीत दर तीन वर्षांनी वाढ करावी असे असताना गत १६ वर्षापासून या निधीत वाढ झालेली नव्हती. या निधीत कामगार हिस्सा २५ रुपये मालक हिस्सा ५० रुपये आणि शासनाचा ७५ रुपये असा हिस्सा आता कपात केली जाणार आहे.

आता पर्यंत अर्धवेळ कर्मचारी ही अतिशय तूट पुण्य पगारामध्ये काम करत होते या कर्मचार्‍यांची पगारवाढीची अनेक दिवसांपासून ची मागणी होती अर्धवेळ असलेल्या कर्मचार्‍यांना किमान पूर्ण वेळ असलेल्या कर्मचार्‍यांच्या अर्धा पगार देण्यात यावा ही अगदी मागणी आमदार संस्थेचे महाले यांनी या बैठकीत मांडली त्यासाठी सुद्धा कामगार मंत्री नामदार सुरेश खाडे यांनी अनुकूलता दर्शविली आहे . त्यासाठी सुधारीत आराखडा तयार करावा लागणार असून, सुधारित आराखडा हा सुधारीत भरण्यात येणार्‍या निधीच्या तुलनेत तयार करण्याच्या सूचना यावेळी ना कामगार मंत्री यांनी दिल्याने आ. सौ श्वेताताई महाले पाटील यांनी राज्यांतील कोट्यावधी कामगार व त्याचे कुटुंबीय यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. तसेच या व्यतिरिक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विवीध मागण्यांबाबत चर्चा करण्यात येऊन त्यावर सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिले आहे. सदर बैठकीत आ. भाई जगताप तसेच कामगार आयुक्त रविराज इळवे तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कृती समितीचे पदाधिकारी सौ. ऊर्मिला सातपुते श्री. प्रल्हाद बांडे, सौ.उज्वला जाधव, सौ.मनिषा कावरे, श्री.गजानन आरु, सौ. सुजाता जाधव , सौ.ज्योती शिंदे, सौ.शुषमा नागोशे, श्री.अमोल कुडाळ हे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!