आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिं. चिं. शहर अध्यक्ष संतोष गुंड, संतकृपा प्रवाशी वाहतूक रिक्षा संघ आळंदी विभाग यांचे वतीने आळंदीतील देहूफाटा परिसरातील भाविक, नागरिक, प्रवासी यांच्या साठी मोफत पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे उदघाटन सामाजिककार्यकर्त्यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगरसेवक सचिन गिलबिले, नियतीताई शिंदे, प्रवीण तापकीर, दिनेश तापकीर, शहाजी तापकीर, संदीप कुरुंद, प्रताप शेळके, स्वप्नील कांबळे, गणेश घोटकुले, सोपान पवळे, सिद्धेश्वर सोनवणे रिजवान तांबोळी, अमोल कांबळे, असिफ शेख, महादेव पोळ यांचेसह रिक्षा चालक, मालक, प्रवासी, नागरिक उपस्थित होते.
नामदेव घुंडरे पाटील यांचे निधन
आळंदी : येथील प्रसिद्ध दूध विक्रेते नामदेव बाळासाहेब घुंडरे पाटील ( वय ५७ वर्षे ) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, जावई, चुलते असा मोठा परिवार आहे. शुभम व अक्षय घुंडरे यांचे ते वडील तसेच अमृतानुभव सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग वरखडे यांचे ते भाचे होत.