देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – इयत्ता दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील वैâ. भास्कररावजी शिंगणे हायस्कूल मंडपगाव-चिंचखेडने उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९७.३६ टक्के इतका लागला आहे. मुख्याध्यापक पी. एस. मिसाळ व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केलेल्या नियोजनबद्ध परिश्रमामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना या परीक्षेत चमकदार कामगिरी करता आली.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८५.८० टक्के गुण घेऊन शेखर गजानन वायाळ हा विद्यालयातून प्रथम आला असून, द्वितीय राहुल प्रकाश देशमुख (८५ टक्के) व सुकन्या नामदेव दांडगे (८५ ट्के), तृतीय नागरे आदित्य गणेश (८२.६० टक्के) व डोंगरे राहुल दिलीप (८२.६० टक्के), चतुर्थ कु.समृद्धी संजय देशमुख (८१.६ टक्के) व साक्षी सुरेश खंडागळे (८१.६० टक्के) तर प्राविण्य श्रेणीत ३२ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत चार व द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.
वैâ. भास्करराव शिंगणे हायस्कूलच्या संस्थेचे सचिव शिवाजीराव चित्ते, अध्यक्ष समाधानराव सोनसळे, साधना न्यूज टीव्हीचे कार्यकारी संपादक तथा ब्रेकिंग महाराष्ट्रचे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, शेळगाव आटोळचे सरपंच डॉ. विकास मिसाळ यांच्यासह चिंचखेड, मंडपगाव, सुलतानपूर, बायगाव या ग्रामस्थांनी या यशाबद्दल मुख्याध्यापक पी. एस. मिसाळ तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

वैâ. भास्करराव शिंगणे हायस्कूलमध्ये खेड्यापाड्यातील मुले-मुली शिक्षण घेतात. त्यांपैकी अनेकांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. इयत्ता दहावीच्या शैक्षणिक काळात कोरोनाचे संकट होते. तरीही विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम शिक्षण, आणि वैयक्तिक अडचणीत विद्यालयाने सर्वतोपरी सहकार्य केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी वैयक्तिक परिश्रम घेतले. त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. काही गरिब मुलांच्या शिक्षणासाठी मला व्यक्तिशः सहकार्य करावे लागले. त्यामुळे विद्यालयाचा निकाल ९७.३६ टक्के इतका घवघवीत लागू शकला.
– पी. एस. मिसाळ, मुख्याध्यापक