-११ मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा
देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे/प्रतिनिधी) – सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लागावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तहसीलदार विजय सवडे यांनी दिली.
दि. ०७ मार्च २०२६ रोजी हातनी मंडळातील हातनी येथे, दि. ०८ मार्च २०२६ रोजी अमडापूर मंडळातील अमडापूर येथे शिबिर होणार आहे. दि. १४ मार्च २०२६ रोजी उदयनगर मंडळातील उदयनगर तसेच चांधई मंडळातील चांधई येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि. १० एप्रिल २०२६ रोजी धोडप मंडळातील धोडप व मेरा खुर्द मंडळातील मेरा खुर्द येथे शिबिर होईल. दि. १७ एप्रिल २०२६ रोजी पेठ मंडळातील पेठ तसेच शेळगाव आटोळ मंडळातील शेळगाव आटोळ येथे शिबिर पार पडणार आहे. दि. ८ मे २०२६ रोजी चिखली मंडळातील चिखली येथे तर दि. १५ मे २०२६ रोजी एकलारा मंडळातील एकलारा व कोलारा मंडळातील कोलारा येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’अंतर्गत शेतकरी व नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे डिजिटल वितरण, उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमीलेअर आदी प्रमाणपत्रांचे वितरण, सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणालीद्वारे तात्काळ सेवा, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान संबंधित सेवा, तक्रार निवारण, अकृषक तरतुदी संदर्भातील सुधारणा मार्गदर्शन तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे या सेवांचा समावेश आहे.
तहसीलदार विजय सवडे यांनी आवाहन केले की, चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी महसूल विषयक प्रलंबित कामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित तारखांना शिबिरास उपस्थित राहून शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा.