– शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या घोषणांनी परिसर दणाणला!
– मेहकरात शाळेतील हिंदी सक्तीच्या निर्णयाची केली होळी!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती करू नये, यासाठी सदर शासन निर्णयाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने मेहकर येथील जानेफळ फाटा, नागसेन चौकात आज, दि.२९ जूनरोजी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात आयोजित आंदोलनात होळी करण्यात आली. खोकेबाज सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.
शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषा सक्तीची करू नये, यासाठीचा शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने मेहकर येथील जानेफळ फाटा, नागसेन चौकात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाने याबाबतच्या काढलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. खोकेबाज सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, फडणीस सरकारचा धिक्कार असो, हिंदीची सक्ती रद्द करा, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता. यावेळी उपजिल्हाप्रमुख आशीष राहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोर गारोळे, युवा सेना तालुकाप्रमुख आकाश घोडे, अॅड. संदीप गवई, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख आरती देशमुख, लोणार तालुका अध्यक्ष तारामती जायभाये, शहराध्यक्षा नगमा गवळी, ऋषी जगताप, किशोर पागोरे, परमेश्वर दहातोंडे , गोपाल आखाडे , पंडित देशमुखसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बुलढाणा येथे स्थानिक संगम चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात शिक्षणातील हिंदी सक्तीचा विरोध करत सदर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी पक्षाच्या प्रवत्तäया अॅड. जयश्रीताई शेळके यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.