– महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज यांच्या भगवानगडावरील बैठकीत यशस्वी तोडगा
– १० एप्रिलपासून नारळी सप्ताहास सुरूवात, १७ एप्रिलरोजी सांगता
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – श्री संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेला भगवानगडाचा परंपरेनुसार सुरू असलेले यंदाचा ९१ वा नारळी सप्ताह अखेर पिंपळनेर, ता. शिरूर, जिल्हा बीड येथे संपन्न होणार असल्याचे आज (दि.२६) महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी जाहीर केले. तर १० एप्रिलपासून सप्ताहास प्रारंभ होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. यानिमित्ताने भाविकांत असलेला संभ्रम दूर झाला आहे.
भगवानगडाचे संत भगवानबाबा यांनी फिरता नारळी सप्ताहास प्रारंभ केला. तो आजही परंपरेनुसार भाविक भक्तांनी कायम सुरू ठेवला आहे. ग्रामस्थ एकत्र येवून लोकसभागतून फिरत्या नारळी सप्ताहाचे नारळ आणून त्याची तीन चार वर्षापासून लोकसहभागातून जय्यत तयारी केली जाते. यंदाचा ९१ वा नारळी सप्ताह मौजे घाटशिळ पारगाव, ता. शिरूर येथे होणार असल्याचे गतवर्षी जाहीर करण्यात आले होते. परंतु संत वामनभाऊ महाराज गहिनीनाथ गड यांचाही यंदाचा नारळी सप्ताह घाटशिळ पारगाव येथे करण्याचे जाहीर झाल्याने तो दिनांक १२ एप्रिल २०२५ पासून प्रारंभ होणार आहे. एकाच गावात दोन नारळी सप्ताह होणार असल्यामुळे भविकात काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. ग्रामस्थ व भाविकांनी दोन्ही सप्ताह एकत्र करण्याचा ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले.
मात्र त्यावर काही एकमत झाले नाही. तसेच भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी यावर अखेर तोडगा काढून पिंपळनेर ता. शिरूर कासार, जिल्हा बीड येथे यंदाचा ९१ वा नारळी सप्ताह करण्याचे आज, बुधवारी पिंपळनेर ग्रामस्थांच्या उपस्थितीत भगवानगडावर झालेल्या बैठकीत जाहीर केले. यावेळी सविस्तर चर्चा होऊन सप्ताहात दिनांक १० एप्रिलला प्रारंभ होऊन सांगता १७ एप्रिल २०२५ रोजी होणार असल्याचे बैठकीत जाहीर केले. उपस्थित ग्रामस्थ व भाविकांनी भगवान बाबा की जय अशा घोषणा देत यंदाचे नारळ स्वीकारले गेले. त्यावेळी पिंपळनेरचे भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी घेतलेले नारळ गावी घेवून गेल्यानंतर ग्रामस्थांनी वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून भव्य दिव्य स्वागत केले. महिला भगिनी डोहीवर कलश घेवून सहभागी झाल्या होत्या. हा सप्ताह यशस्वीपणे साजरा करण्यासाठी ग्रामस्थ आता सज्ज झाले आहेत. तर भविकात सुरू असलेला संभ्रम आता दूर झाला आहे.
संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेला
९१ वा नारळी सप्ताह कार्यक्रम रूपरेषा
– प्रारंभ १० एप्रिल, सांगता १७ एप्रिल २०२५
– ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण
वेळ: ५ ते ७
वक्ते : न्यायाचार्य श्री. नामदेव महाराज शास्त्री
दररोज हरिकीर्तन रात्रौ ९ ते १९
दिनांक १० रोजी श्री. कृष्णा महाराज शास्त्री उत्तराधिकारी भगवानगड
दि ११ रोजी श्री. प्रभाकर महाराज बोधले पंढरपूर
दि १२ श्री. सोपान महाराज शास्त्री
दि १३ श्री. निवृत्ती महाराज इंदोरीकर
दि १४ श्री. अमृत महाराज जोशी
दि १५श्री. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर
दि १६ रात्रौ व काल्याचे कीर्तन सकाळी ११ ते १ महंत डॉ
श्री. नामदेव महाराज शास्त्री.. या प्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहेत
——–