साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वेतनाचे लेखाशीर्ष – २२०२- ३५२१ (प्लॅन) मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर पदे लेखाशीर्ष मध्ये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून वर्ग करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत सन 2011 पासून म्हणजेच गेल्या १२ वर्षांपासून शासन स्तरावर विद्यापीठाकडून पाठपुरावा सुरू होता. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार वित्त व लेखा अधिकारी CA श्रेणिक शाह, राजीव खपाले व वित्त विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे शासन स्तरावरील वेळोवेळी पाठपुरावामुळे यश प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने कुलगुरू यांचा व वित्त व लेखा अधिकारी यांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या मान्यतेमुळे भविष्यात विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर वेतन विषयक अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही. ज्या त्या वर्षी अनुदान मिळणार आहे.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, उपाध्यक्ष कांचन आघाव, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजीव खपाले, श्रीशैल देशमुख, महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, संतोष क्षीरसागर, खजिनदार हरीश गारमपल्ली, चिटणीस उज्ज्वला दंतकाळे, दिलीप हाके, व्यवस्थापन समिती सदस्य सदस्य मुख्तार शेख, भागवत घंटे, जाकीर पठाण, तुकाराम पवार, श्वेता स्वामी, सदस्य माधवी पारेकर, गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.