साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक एक आठ, पंधरा दिवस नव्हे तर चक्क चोवीस मिनिटात सभासदांना कर्ज देणार आहे. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कमी वेळेत कर्ज दिल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रणालीचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी त्यांनी कौतुक केले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुरक्षेत्रावर काम करणाऱ्या व मुख्यालय स्तरावर काम करणाऱ्या सभासदांसाठी कर्ज च्या अर्ज घेण्यासाठी पतसंस्था कार्यालयात येणे, कर्ज अर्ज जमा केल्यानंतर जमा होणेस विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीचे कर्ज अर्ज पतसंस्थेचे वेबसाईट www.soczpsno1.in यावरून डाऊनलोड करून प्रिंट काढून भरावयाचा आहे. त्यानंतर पतसंस्थेच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे. अत्यंत कमी वेळात सभासदांना घरबसल्या किंवा ऑफिस मधून कर्जाचे अर्ज भरून तातडीने किमान अर्ध्या तासात सभासदाच्या बॅंक खात्यावर तातडीच्या कर्जाची रक्कम जमा केली जाईल. ही प्रणाली विकसित केल्यामुळे सभासदांचे येणे जाण्याचा खर्च वेळ व दुरच्या तालुक्यातील सभासदांना या कारणासाठी काढावी लागणारी रजा बचत होणार आहे. यामुळे सभासदांना अतिशय जलद व सुखकर अशी प्रणाली उपलब्ध झाल्याने सभासदांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रसन्ना स्वामी यांनी हे काम केले आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन हरीबा सपताळे, आभार प्रदर्शन व्हाइस चेरमन धन्यकुमार राठोड, सूत्रसंचालन डॉ.एस. पी. माने तज्ञ संचालक यांनी केले. योजनेची माहिती व प्रणाली संकल्पना ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज यांनी दिली. या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, अनिल जगताप, विष्णु पाटील, दीपक घाडगे, सुहास चेळेकर, दत्तात्रय घोडके, शाहजान तांबोळी, सुंदर नागटिळक, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, त्रिमुर्ती राऊत, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी , सचिव दत्तात्रय देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रीधर कलशेट्टी, अशोक पवार, सुभाष काळे, विनोद कदम, नितीन येमुल यांनी घेतले.