CrimeMarathwada

गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; रेकॉर्डिंग करून पतीला पाठवले, पतीने केली आत्महत्या!

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – विवाहितेवर गुंगीचे औषध देत लैंगिक चाळे व बलात्कार केला. त्यानंतर तिच्याशी अश्लील संभाषण केले व त्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठवले. या सर्व प्रकाराने खचलेल्या व नैराश्यात गेलेल्या पतीने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित विवाहितेने पारध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीवरून दोन महिलांसह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग व बलात्कारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेले आहे.

या घटनेतील आरोपी असलेल्या दोन महिलांनी व गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ या गावातील आरोपींनी पीडित विवाहितेला रवी दत्तात्रय सपकाळ या तरुणाशी फोनवर बोलण्यास लावले. त्यानंतर तिला या युवकाकडे नेत, गुंगीचे औषध दिले. ती अर्धवट बेशुद्ध झाल्यानंतर तिच्याशी लैंगिक चाळे करत तिच्यावर बलात्कार केला. या सर्व प्रकाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच, या विवाहितेला रवी सपकाळ याच्याशी बोलण्यास लावून त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले व ते तिच्या पतीला पाठवले. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या व बदनामीच्या भीतीपोटी या विवाहितेच्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे या विवाहितेने पारध पोलिस ठाणे गाठत, आरोपी गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ, आणि दोन महिला यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार, विनयभंग या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रुपेकर हे करत आहेत.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!