लाेणार (तालुका प्रतिनिधी) – लोणार तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोकराव बुरकुल यांचे पुर्वपरवानगीने मोतीराम डव्हळे माजी जिल्हाध्यक्ष व कार्यरत तालुका अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली लोणार तालुका ग्रामसेवक संघटनेची सभा ग्रामसेवक पतसंस्था संचालक पदासाठी लोणार तालुक्या मधुन निवड करणे व लोणार तालुका नवीन कार्यकारणी गठीत करणेबाबत आयोजीत करण्यात आली होती. लक्ष्मणराव जायभाये यांची ग्रामसेवक पतसंस्था संचालक पदासाठी एकमताने निवड करण्यात आली. तसेच लोणार तालुका ग्रामसेवक संघटनेची खालील प्रमाणे नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. अध्यक्ष नंदकिशोर परमेश्वर तेजनकर तर सचिव हरिदास रिंढे, कार्याध्यक्ष अनंता आघाव, कोषाध्यक्ष प्रमोद मापारी, उपाध्यक्ष किशोर भाग्यवंत, महिला उपाध्यक्ष कुतांगडे मॅडम, सहसचिव विजय दांडगे, संघटक सज्जन गवई, महिला संघटक कु. बोडखे मॅडम, कायदे सल्लागार गजानन कावरखे, राधेश्याम दळवी, लेखापरीक्षक शेख महेमुद, प्रसिद्धी प्रमुख संदीप ठाकरे, मार्गदर्शक संदीप जायभाये, सदस्य अरविंद पोफळे, सुनील रहाटे, शीतल फुफाटे सदरील सभेसाठी सभेस संतोष क्षिरसागर जिल्हा सहसचिव ,लक्ष्मणराव जायभाये, आसाराम फुफाटे हे उपस्थीत होते.
सभेत सर्व पदाची निवड माजी जिल्हाध्यक्ष मोतीराम डव्हळे यांचे मार्गदर्शनाखाली एकमताने करण्यात येऊन बिनविरोधची प्रथा नेहमीप्रमाणे पाळण्यात आली. सभेत अडीच वर्षांनंतरचा कार्यकाळ संपल्यावर तालुका अध्यक्ष पदासाठी सुनील सानप यांची निवड सुध्दा सभेच्या मान्यतेनंतर करण्यात यावी, असे एकमताने ठरविन्यात आले.