मेहकर (तालुका प्रतिनिधी) – येथील कलावंती महालाजवळील हजरत पहाडी सरकार दर्गा येथे सुरु असलेल्या उर्स शरीफ अर्थात जत्रेत पाळणा कोसळला असून, या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर इतरही काही जखमी झाले आहेत. काल रात्री ही दुर्घटना घडली असून, याबाबत मेहकर पोलिस अधिक तपास करत आहेत.
मेहकर येथील कलावंती महालाजवळ हजरत पहाडी सरकार दर्गा परिसरात उर्स शरीफ अर्थात जत्रा सुरू असताना याठिकाणी रात्री एक पाळणा कोसळला. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून, काशिफा फिरदोस असे या महिलेचे नाव आहे. हा पाळणा कोसळल्याचा थरारक दृष्य कॅमेर्यात कैद झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाळणा मालकांच्या हलगर्जीपणामुळे हा पाळणा कोसळला असल्याचे सांगितले जात असून, जखी महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात येत आहे. या यात्रेत हजारोंच्या संख्येने यात्रेकरू सामील झाले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातप्रकरणी मेहकर पोलिसांकडून तपास सुरु आहे.
——————