धुळे । प्रतिनिधी
धुळे शहरालगत असलेले लळींग येथील बौद्ध बांधवांच्या स्मशान भूमीचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. यामुळे समाज बांधवांची गैरसोय होत होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन लळींग ग्रामपंचायतीचे गटनेते मा. जि. प.सदस्य संभाप्पा गवळी, पुणाजी आण्णा लळींगकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्राम. पं. सदस्य बापु साने यांनी आ. कुणाल पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून लळींग गावात स्मशान भूमी मंजूर करून घेतली. या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सरपंच पुजाताई दीपक परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढील वृत्त असे की, लळींग गावातील बौद्ध बांधवांचा स्मशान भूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला होतो. यामुळे समाज बांधवांना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर समस्या मा. जि.सदस्य संभाप्पा गवळी, ग्राम.पं. सदस्य बापु साने यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या लक्षात आणून दिली. व मंजुरीसाठी पाठपुरावा केला. या समस्येची दखल घेऊन आ. कुणाल पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सबलीकरण योजनेतून लळींग येथील बौद्ध समाजासाठी स्मशानभुमी मंजूर करून दिली. व या कामाचे भूमिपूजन सरपंच पुजाताई दीपक परदेशी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. दरम्यान यावेळी ग्रामविस्तार अधिकारी बी.एन. पाटील, मा.जि. सदस्य संभाप्पा, ग्राम. पं. सदस्य बापु साने, ग्राम.पं. सदस्य कैलास परदेशी, मा. ग्राम.पं. सदस्य अविनाश बळसाने,
मा. ग्राम.पं. सदस्य रामलाल बळसाने, मा.ग्राम.पं. सदस्य रवींद्र ठाकरे, मा. ग्राम.पं. सदस्य किसन गवळी, इंजि. विकास चौधरी, पोलीस पाटील सुनिल परदेशी, ग्राम. पं. कर्मचारी विजय पाटोळे, सुनिल पाटोळे, नंदलाल गवळी, बन्सीलाल बळसाने, फिरोज पठाण, जगदीश साबरे, कोंडाजी गवळी, अनिल पाटोळे, प्रदीप सैंदाने, विशाल बळसाने, राजेंद्र बळसाने आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी बापु साने यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जि. प.सदस्य अरुण पाटील यांचे आभार मानले.