-महिलेची ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांचे आवाहन; नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
रायपूर (महेंद्र हिवाळे) : रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैलानी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ६५ वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर महिलेच्या जवळ ‘लिलावती मुंडे’ हे नाव नमूद असलेली दवाखान्याची चिठ्ठी तसेच एक छायाचित्र आढळून आले आहे. मात्र, अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.
माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
सदर महिला आपल्या गावातील, परिसरातील किंवा परिचयातील असल्यास, तसेच तिच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने रायपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. महिलेची ओळख पटविण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन रायपूर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे आणि पोलीस कर्मचारी अझरुद्दीन काझी करीत आहेत.
संपर्क क्रमांक :
पोलीस स्टेशन रायपूर : ०७२६२-२७००३०
पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे : ८४२१६१३३८२
अझरुद्दीन काझी : ९३७०९६१९६२
— पोलीस स्टेशन रायपूर, जिल्हा बुलढाणा