-राष्ट्रीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार नियुक्त्या; संघटना मजबूत करण्याची जबाबदारी
बुलढाणा (वाजिद खान) : रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार संघपाल पनाड यांची रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष इंजि. विजय मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, युवकांना संघटित करून पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सामाजिक व संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नागवंशी संघपाल पनाड यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार प्रामाणिकपणे कार्य करून रिपब्लिकन सेनेची संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघपाल पनाड यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.