-गणेश आरती, रामरक्षा स्तोत्र वाटप करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध
आळंदी (अर्जुन मेदनकर) : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहारप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आळंदीत जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. गणेश मंदिर चौक येथे गणेश आरती, पसायदान आणि रामरक्षा स्तोत्र पठण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आवेकर-भावे रामचंद्र संस्थान श्रीराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेण्यात आले. मंदिराचे विश्वस्त अर्जुनराव मेदनकर यांच्या हस्ते उपस्थितांना रामरक्षा स्तोत्राच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा तीव्र निषेध करण्यात आला. खेड तालुका व आळंदी पंचक्रोशीतील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान ज्येष्ठ शिवसैनिक विजयाताई शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहारप्रकरणी संबंधित विश्वस्त व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंदिराच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे यांनीही अयोध्या श्रीराम मंदिराच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी खेड तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भाषणातून या प्रकरणाचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात खरेदी-विक्री संघाचे संचालक किरण लोखंडे, हिरामण लोखंडे, दत्ता हारदे, रोहिदास जाधव, सार्थक गोडसे, उपजिल्हाप्रमुख सचिन गावडे, महिला जिल्हाध्यक्ष विजयाताई शिंदे, सहसंघटक लक्ष्मणराव जाधव, शिवदूत सचिन राक्षे, उपविभाग प्रमुख मधुकर शिर्के, तानाजी गाढे, काळूराम थोरवे, अमोल पठारे, नंदाताई धायबर, विश्वास नेहरे, भानुदास येळंवडे, ज्योतीरादित्य लोखंडे, अनिताताई झुंजूम, शोभा कुलकर्णी, कल्याणी मालप, सावित्री घुंडरे, विमल मुसळे, लता वर्तले, सविता कांबळे, शैला तापकीर, सरस्वती भागवत, सुरेखा काळभोर, आनंदराव मुंगसे पाटील, शशीकांत राजे जाधव, गणेश नेटके, मंगेश तिताडे, मनोज पवार, निखिल तापकीर, आशिष गोगावले, श्रीपाद सुर्वे, ओंकार इंगळे, जयहरी डिवरे, चारुदत्त रंधवे, संजय शेठ वडगावकर, विलास कुऱ्हाडे पाटील, उत्तमराव गोगावले, विजय राजने, हनुमंत थोरवे, सचिन तापकीर, माजी सरपंच काळूराम थोरवे यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.