खामगाव -: (ब्रेकिंग महाराष्ट्र): इतर शाळांप्रमाणे आपलीही शाळा मॉडेल व्हावी असे न वाटणारा शिक्षक क्वचितच सापडेल.कारण प्रत्येकाला आपली शाळा खूप चांगली व्हावी असे वाटते पण त्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे.कारण समाज तुमचे काम पाहून मदतीला धावून येतोच.असाच प्रत्यय आला तो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा हिंगणा कारेगाव शाळेचे मुख्याध्यापक राजेश कोगदे यांना . परंतु आधी केले मग सांगितले असे असेल तर तुम्ही ठरवलेले सर्व काही सत्यात उतरायला वेळ लागत नाही.याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे हिंगणा कारेगाव येथील जि प शाळा व तेथील ग्रामस्थ.
बदल प्रत्येकाला हवासा वाटतो परंतु सुरुवात दुसऱ्याने करावी अशी समज असल्याने मनाला पाहिजे तसा बदल दिसून येत नाही हेच सत्य समजून घेऊन शाळेचा कायापालट स्वतःपासून सुरू करण्याचा निर्धार केला तो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा हिंगणा कारेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश वासुदेव कोगदे यांनी .श्री कोगदे सरांनी शाळा मॉडेल करण्यासाठी सर्वप्रथम शाळेची रंगरंगोटी करण्याची ठरवले यासाठी त्यांनी आपला एक महिन्याचा पगार शाळेसाठी खर्च केला आणि सरांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये ग्रीनशेड, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन ,जेवणासाठी प्लेट्स ,साऊंड सिस्टिम ,पोडियम ,कार्यालय सजावट अशा वस्तूंचा समावेश आहे. यासाठी माणिकराव जाधव उमरावसिंग चव्हाण , शेषराव चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, मनोहर जाधव, संघपाल जाधव,प्रमोद जाधव,गौतम जाधव , संदीप जाधव, विद्याताई जाधव,प्रा.प्रमोद चव्हाण, गोपाल पानझाडे , न्यू समता कबड्डी संघ,संजय दहिभात , सुभाषसिंग चव्हाण , जानराव जाधव यांनी मोलाची मदत केली. विशेष म्हणजे न्यु समता कबड्डी संघाच्या संपूर्ण टिमने दोन दिवस श्रमदान दिले.
हिंगणा कारेगाव शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षकवृंद तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षणाची तळमळ असणारे ग्रामस्थ यांचे खूप खूप अभिनंदन त्यांनी समाजापुढे अशाप्रकारच्या शैक्षणिक कार्यातून एक चांगला आदर्श ठेवला.
मा.रविंद्र चेके
केंद्रप्रमुख पळशी