-देऊळगाव राजा येथे बिनविरोध निवड; विलास जगताप अध्यक्षपदी
देऊळगाव राजा (सुरेश हुसे): व्हाईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी आज देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात जाहीर करण्यात आली. ही बैठक तालुका अध्यक्ष अर्जुनभाऊ आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत तालुका अध्यक्षपदी विलास जगताप, उपाध्यक्षपदी विजय जाधव व शेख हनीफ, सचिवपदी संमती जैन, कोषाध्यक्षपदी पूजा कायंदे, सहसचिवपदी गजानन भालेकर, तर प्रसिद्धीप्रमुखपदी नंदकिशोर देशमुख यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील मतकर, जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रदीप हिवाळे, रमेश चव्हाण, अमोल बोबडे, गजानन घुगे, देवानंद झोटे, खंडू माटे आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. पत्रकारांच्या हक्कांसाठी, पत्रकारितेतील मूल्यसंवर्धनासाठी तसेच तालुक्यातील सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघटना अधिक सक्रिय राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.