-विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे ) : येथील जानकीदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दत्तक ग्राम कोनड खुर्द येथे पाचव्या दिवशी प्रभातफेरी, लेझीम पथक व डंबेल्स पथकाने विविध कलाप्रकार सादर करत गावकऱ्यांची मने जिंकली. सकाळी ८ वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून ढोल-ताशांच्या गजरात व जानकीदेवी विद्यालयाच्या बँड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी गावाच्या मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली.

तेथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे, कोनडचे सरपंच संजय वानखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ वानखेडे, माजी सरपंच दादाराव सुरडकर, माजी सरपंच पंजाबराव जावळे, पोलीस पाटील अरुण जावळे, प्राचार्य हरिदास घुबे तसेच गावा
तील ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर जानकीदेवी विद्यालयाच्या ढोल पथकाने बहारदार प्रदर्शन सादर केले. रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम व डंबेल्स पथकाने आपल्या कलागुणांचा प्रभावी आविष्कार करत वेगळा ठसा उमटविला.

जानकीदेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “माणूस बना, तुम्ही माणूस बना” हे पथनाट्य सादर करत
र, स्त्री भ्रूणहत्या तसेच शेतकऱ्यांची होत असलेली लूट अशा गंभीर विषयांवर प्रभावी प्रकाश टाकला. या पथनाट्यातील अभिनय पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे राहत होते, तर अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. पाण्याचा अपव्यय व पर्यावरण या विषयावर सादर केलेल्या अभिनयातून विद्यार्थ्यांनी “नका करू पाण्याचं वेस्टिंग आणि शेतात करा वॉटर हार्वेस्टिंग” असा संदेश देत उपस्थित शेतकऱ्यांना जागृतीचा सल्ला दिला. रामकृष्ण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारुडाद्वारे समाजातील वाईट चालीरीती व भ्रष्टाचारावर प्रकाश टाकत गावकऱ्यांची दाद मिळवली.
माणसा-माणसांतील असमानता, भेदभाव, अस्पृश्यता, जातीवाद, भ्रष्टाचार, स्त्री शिक्षण, स्त्रियांवरील अत्याचा
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोहन बुरकुल, ओम परिहार आणि विराज पैठणे यांनी साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका, तसेच आरती पुरी, प्राची थट्टे व श्रुती भुसारी यांनी साकारलेल्या सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व माता रमाई यांच्या वेषभूषा ठरल्या. कार्यक्रमाच्या शेवटी कोनडचे माजी सरपंच व जानकीदेवी विद्यालयाचे माजी विद्यार्थी दादाराव सुरडकर यांनी जानकीदेवी विद्यालय हे संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट शिक्षणदालन असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांनी संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांच्या योगदानाचे विशेष उल्लेख केले. तसेच कोनड येथे शिबिराचे आयोजन करून गावातील साफसफाई केल्याबद्दल शाळेतील सर्व प्राध्यापक वर्ग व संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमास सरपंच संजय वानखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ वानखेडे, पोलीस पाटील रंगनाथ जावळे, माजी सरपंच पंजाबराव जावळे, दादाराव सुरडकर, तुळशीदास जावळे, सुखदेव जावळे, प्रताप वानखेडे, जीवन जावळे, रामदास झाल्टे, गजानन जावळे, रमेश जावळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रा. उद्धव घुबे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले व उपस्थित गावकऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डिगांबर थुट्टे, दिलीप थुट्टे, संतोष मिसाळ, अमोल डुकरे, प्रा. प्रमोद चव्हाण, प्रा. पडोळे मॅडम, प्रा. पुनम मॅडम व रामेश्वर क-हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.