उत्कर्ष साहित्यरत्न’ प्रा.सदानंद देशमुख; ‘उत्कर्ष शिक्षकरत्न’ जनाबापू मेहेत्रे यांना प्रदान
मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांचाही विशेष सत्कार
राजेंद्र काळे
सिंदखेडराजा : भारत देश हा आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. महाशक्ती होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल जरी सुरु असलीतरी, शिस्त जर स्वयंशासनातून नागरिकांनी अंगी बानवली तरच भारत देश हा खऱ्याअर्थाने प्रगतीपथावर जाईल, असे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अवर सचिव सौ.सुवर्णा सिध्दार्थ खरात यांनी केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन, मनन व चिंतन आवश्यक असून मनातील न्यूनगंड काढून टाकत कठोर परिश्रम हाच एकमेव मार्ग यशस्वी होण्याचा असल्याचे ‘बारोमास’ कार प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांनी सांगितले.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे उत्कर्ष फाऊंडेशन द्वारा संचलित उत्कर्ष महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिन वर्धापनदिन पर्वावर सोमवार १५ ऑगस्ट रोजी साहित्य क्षेत्रातील प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांना ‘उत्कर्ष साहित्यरत्न’ तर शिक्षण क्षेत्रात काम करतांना शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त शिक्षक जनाबापू मेहेत्रे यांना ‘उत्कर्ष शिक्षणरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या पुरस्कार वितरणासाठी उत्कृष्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा मंत्रालयीन अवर सचिव सिद्धार्थ खरात तसेच मंत्रालयीन अवर सचिव डॉ.सुवर्णा खरात व अंकुर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद गोंडे पाटील, तहसीलदार सुनील सावंत उपसित होते.
सत्काराला उत्तर देतांना जनाबापू मेहेत्रे यांनी शिक्षणातून स्वावलंबी व चारित्र्य संपन्न युवक निर्माण होऊन समाजहित, राष्ट्रहित, महापुरुषांचा व समृद्ध वसुंधरेचा वारसा जपणारे आदर्श नागरिक निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तर प्रत्येकाने आपले समृद्ध साहित्य वाचून प्रतिभावान होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन राजेंद्र काळे यांनी केले.
विद्यार्थ्यांना आधुनिक काळात आव्हान पेलण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी अभ्यासाचा व्यासंग जोपासा, असे आवाहन डॉ.सुवर्णा खरात यांनी विद्याथ्र्यांना केले. अध्यक्षीय मनोगतात उत्कर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांनी उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून गुणवंत विद्यार्थी व आदर्श नागरिक निर्माण होतील, असा विश्वास दिला. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन पर्वावर ग्रामीण भागातून अधिकारी निर्माण व्हावेत या उद्देशाने महाहवद्यिालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते केले गेले. कार्यक्रमासाठी विजय तायडे, गणेश झोरे, प्रा. रवींद्र साळवे, प्रवीण गीते, गंगाधर खरात, भास्कर गवई, प्रा.अक्षय खरात, रोहित मस्के, शाहीर गौतम जाधव, हाजी शेठ, प्राचार्य सुनील सुरुले आदी उपस्थित होते.