– शेतकर्यांना सरसकट मदत करणार!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा मंडळात ९ आणि १५ ऑगस्टरोजी अतिवृष्टी होऊन अनेक घराची पडझड झाली. शेतजमिनी खरडल्या, पुल वाहून गेला. त्या सर्व भागाची पाहणी आमदार मनोज कायंदे यांनी आज, दि. २९ ऑगस्ट रोजी केली. येत्या दोन दिवसांत साखरखेर्डा आणि शिंदी येथील ज्या घराची पडझड झाली, त्यांना शासनाच्यावतीने मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पडझडीचे पैसे जमा झाले असून, ते मिळणार आहेत, असेही त्यांनी शिंदी येथील नागरिकांना सांगितले.
साखरखेर्डा मंडळातील शिंदी, साखरखेर्डा, सवडद, राताळी , मोहाडी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, गोरेगाव या गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने जमिनी खरडल्या आहेत. पिके वाहून गेली आहेत. शिंदी येथील टेकडी वरील पाणी वाहात घरात घुसून घरे पडली. सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज मनोज कायंदे यांनी केली. ज्यांची घरे पडझडीने क्षतीग्रस्त झाली, त्या कुटुंबाला शासनाकडून तत्काळ मदत मिळावी म्हणून अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मागणी केली होती. शासनाने तत्काळ शिंदी येथील २९ आणि साखरखेर्डा येथील २८ कुटुंबातील प्रमुखांच्या खात्यात दोन दिवसात जमा होईल, असे आश्वासन यावेळी सरपंच साधना अशोक खरात यांना दिले. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत असताना सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अहवाल तयार करून पाठविण्यात यावा, असे निर्देश नायब तहसीलदार प्रांजल पवार यांना दिले. तेव्हा पवार मॅडम यांनी प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती दिली. त्याचीही मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बोलून तत्काळ कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकर्यांना सांगितले. सवडद येथील कोराडी नदीवरील वाहिलेल्या पुलाची पाहाणी यावेळी कायंदे यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना या पुलाचे नव्याने इस्टिमेट तयार करून पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी निर्देश दिले. यावेळी सरपंच साधना अशोक खरात, माजी उपसभापती सुनील जगताप, सवडदचे सरपंच गजानन देशमुख, नितीन कायंदे, देऊळगाव राजा नगरपालिकीचे माजी अध्यक्ष संतोष खांडेभराड, प्राध्यापक सदाशिव मुंढे, परमेश्वर खरात, शिवराम मुदमाळा, आशीष पोंधे, मधुकर गावडे, रमेश खरात, शेषराव बंगाळे, संतोष बंगाळे, राजू खरात, शिवसेना नेते गजानन देशमुख, सचिन खंडारे, विशाल खरात, विठ्ठल बुरकुल, पंढरी बुरकुल, उमेश खरात, विनायक पुणेकर, परमानंद खरात, बंद्रीभाऊ खरात, दत्ता बुरकुल, संजाब रुपराव खरात, शिवदास भास्कर खरात, गोपाल खरात, शरद खरात, शंकर वर्हांडे, आकाश खरात, विजय बंगाळे , परमेश्वर आटोळे, पंढरी आटोळे, मनोज वैद्य, पद्माकर खरात, प्रशांत डुकरे, मंडळ महसूल अधिकारी रघुनाथ सोळंके, ग्राम महसूल अधिकारी तुषार भौवरकर, लखन राजपूत, कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे, ग्रामपंचायत अधिकारी दिनकर काळे यांची उपस्थिती होती.