– गावात तणावपूर्ण शांतता; पोलिस बंदोबस्त तैनात!
– निळा झेंडा व कंपाउंडही उखडून फेकण्याचा प्रयत्न
लोणार (वाजिद खान) – तालुक्यातील वेणी गावात अज्ञात महिलेने ध्वगवा ध्वज काढून फेकून दिल्याने तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी वेळीच धाव घेऊन शांतता प्रस्थापित केली आहे. गावात सद्या तणावपूर्ण शांतता असून, या महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे, हा ध्वज काढून फेकून देण्याची संबंधित महिलेची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेली आहे. तसेच, अन्य एका गटाने निळा झेंडा व कंपाउंडदेखील काढून फेकून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत घातली असून, अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. गावात सद्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, काही समाजकंटक वातावरण तणावपूर्ण बनविण्याचा प्रकार करत असल्याचेही दिसून आले आहे. सोशल मीडियावर याबाबत प्रसारित होणारे व्हिडिओवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…