देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे वस्त्रवाटप करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलडाणा जिल्ह्याच्यावतीने प्रदेश सचिव सतीश बोर्डे यांच्याहस्ते हे वस्त्रवाटप पार पडले.
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीद्वारे संचलित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे निराधार, बेघर, बेवारस, घरातून काढून दिलेले असे वयोवृद्ध यांची सर्व प्रकारे मोफत सेवा देणे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाई जयंतीनिमित्त वृद्धाश्रमातील वृद्धाना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलडाणा जिल्ह्याच्यावतीने प्रदेश सचिव सतीश बोर्डे यांच्याहस्ते वस्त्रवाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनाताई वाघ जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक प्रदेश सचिव सतीश बोर्डे तर प्रमुख उपस्थितीमध्ये शरद खरात जिल्हा अध्यक्ष, हिम्मतराव जाधव तालुका अध्यक्ष, प्रकाश पाटील युवा जिल्हा अध्यक्ष, विशाल गवई, दीपक साळवे, कमलबाई सुरडकर हे होते.
निराधारांच्या सेवेकरिता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडून निधीची पूर्तता करू, असे आश्वासन प्रदेश सचिव सतीश बोर्डे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी दीपक जाधव, सागर जाधव, दीपक साळवे, रविशंकर डोंगरदिवे, मनोहर डोंगरदिवे, सिद्धार्थ डोंगरदिवे, रघुनाथ डोंगरदिवे यांच्यासह गावातील इतर समाज बांधव उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे तुकाराम आश्रय वृद्धाश्रमच्यावतीने प्रशांत डोंगरदिवे यांनी आभार व्यक्त केले.