– संत गजानन महाराज संस्थान बिबी येथे प्रगटदिन सोहळा साजरा!
बिबी (ऋषी दंदाले) – सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान बिबीच्यावतीने दि.२० फेब्रुवारीरोजी ११ क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला, तसेच हरिभक्त परायण सारंगधर महाराज टेके यांच्या काल्याचे कीर्तन पार पडले. महाप्रसादासाठी पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी सहकार्य केले.
महाप्रसादाचे वितरण बिबी नगरीचे सरपंचमातोश्री चंदाबाई गुलमोहर व बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व सानप साहेब, रमेश कुरंगळ, विक्रम शेरे, वैभव शेळके, गोटू अवघडे, गोविंद टेके, पांडुरंग मिसाळ व संजू टेके, विठ्ठल गायके, संतोष गायके, गोपाल महाराज टेके यांच्या व गावकरी व संस्थान विश्वस्त यांच्याहस्ते करण्यात आले. महाप्रसादाचा शेकडो भाविक-भक्तांनी लाभ घेतला. यावेळी अनेक दिंड्यांनी श्रींच्या नामघोषात नगरप्रदिक्षणा घातली. प्रगटदिन सोहळ्यानिमित्त बिबीनगरी संत गजाननमय झाली होती. या ठिकाणी अखंड भगवंताचे नामचिंतन करत नगरप्रदक्षिणा संपन्न झाली.