– सिंदखेडराजा तालुक्यात बट्याबोळ झालेल्या ‘जलजीवन मिशन’च्या घोटाळ्यांत नवे पालकमंत्री लक्ष घालतील का?
– पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न तालुक्यात भंगले; अधिकारी, ठेकेदारांनी लावला साडेचार कोटीला चुना?
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पाणीटंचाई असलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी ८१ कोटी ६५ लाख रूपयांची जलजीवन मिशनअंतर्गतची पाणी पुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली आहे. मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून वारंवार या जलजीवन मिशनचे नवनवीन कारनामे समोर येताना दिसत आहेत. अद्याप एकही काम पूर्ण झाले नसून, तालुका हा तहानलेलाच आहे. ८१ कोटी खर्च करूनसुद्धा जर तालुका तहानलेला असेल तर याकडे लक्ष कोण घालणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, याप्रश्नी आवाज उ’विणार्या वाघजाईच्या सरपंचांना संबंधित ठेकेदाराने धमकी दिली होती. या ‘ेकेदारावर कारवाईसाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आज जलजीवन मिशनच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
जलजीवन मिशनची कामे करणार्या ठेकेदारांची दादागिरी, अधिकार्यांच्या गोलमेल, या प्रकाराने आता नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. या प्रश्नावर बोलण्यास कोणीही तयार नाही, अद्याप कामे पूर्ण नसून अधिकारी संबंधितांना तक्रारदारांना वेळ मागत आहे. सद्यस्थितीमध्ये याकडे कोणीही लक्ष घालायला तयार नसून, जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव हे या विषयाकडे लक्ष घालतील का? ही माफक अपेक्षा आता सिंदखेडराजा तालुक्यातील त्रस्त नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. ७६ गावांसाठी ८१ कोटींची कामे मंजूर होऊन अद्यापही काम पूर्ण नसून, कामे मंजूर झाल्यापासून मागील पाच वर्षांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न हा तालुक्यात जोर धरत आहे. मागील पाच वर्षात चक्क चार कोटी ४२ लाख ४६ हजार ९४० रुपये पाणी टंचाईवर शासनाला खर्च करावी लागलेत, यामध्ये जलजीवनची गावेच मोठ्या प्रमाणात सामील असून, विहीर अधिग्रहण व टँकरसाठी वरील निधी खर्च करण्यात आला आणि यापुढे जोपर्यंत कामे पूर्ण होत नाही, तोपर्यंत शासनाला पाणीटंचाईवर किती खर्च करावा लागेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात धरून आहे. कामे पूर्ण होणारच नसेल पाणी टंचाईचा वेगळा निधी गावावर खर्च करायचा असेल तर जलजीवन मिशन ही योजना कशासाठी? असा सवाल तालुक्यातील जनता करीत आहे.
नुकतेच तालुक्यातील वाघजई येथील सरपंचांनी उपविभागीय अभियंता यांच्याकडे ठेकेदाराने वाघजई गावाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने वाघजई येथील सरपंच गजानन सानप यांना १७ जानेवारीरोजी धमकी दिली की तुझ्या गावाला एकही थेंब पाणी पुरवठा करणार नसून, तुझ्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंबंधी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र मागील एक महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा धक्कादायक प्रकार लक्षात घेता, संबंधित पोलीस स्टेशनने तातडीने ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. संबंधित ठेकेदाराचे नातलग पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली असून, आता पोलिस खातेदेखील कोणाच्या दवाबाखाली न येता काय कारवाई करेल, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधल्या गेले आहे.