पाचोड (विजय चिडे) – संपूर्ण राज्यात गुटखाबंदी सुरू असताना सर्वत्र छुप्यापद्धती गुटखाची सर्रास विक्री सुरु आहे. पाचोड-पैठण रस्तावरील दावरवाडीत कारमधून अवैधरित्या गुटखाची तस्करी करणाऱ्या एकास पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल पाटील यांच्या पथकाने (दि.२५)रोजी सकाळी साडे आकाराच्या दरम्यान पकडले. संदीप दतात्रय तांगडे रा.दावरवाडी असे या गुटखातस्कराचे नाव आहे. या कारवाईने ग्रामीण भागातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून, गुटखा माफिया भूमिगत झाले असल्याचे पाहावयास मिळाले होते.
या विषयी अधिक माहिती अशी की, पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दावरवाडी गावात अवैध गुटख्याची कारमध्ये ठेऊन विक्री करत होत असल्याची प्राथमिक माहिती गुप्तबातमीदारामार्फत पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल पाटील यांच्या पथकाला भेटली असता, पथकातील सपोनि.जनाबाई सांगळे व त्यांच्या सहकार्याने तात्काळ दावरवाडीत सापळा रचून स्विफ्ट क्रमांक (एम.एच.१२.जेयु.7941)कारमध्ये अवैधरित्या गुटका विक्री करणाऱ्या संदीप दतात्रय तांगडे रा.दावरवाडी ता.पैठण याला ताब्यात घेऊन या कारवाई मध्ये सहा लाख 73 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक जनाबाई सांगळे ,पो.ना.अरुण जाधव,सचिन भुमे,संतोष तोडकर,पो.का.गणपत भवर,सुनिल कानडे,अमोल सोनवणे आदींनी पार पाडली आहे.