बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) शेतात काम करत असतांना पाऊस सुरु झाल्याने निंबाचे झाडा खाली आश्रयाला गेलेल्या त्या झाडावरच विज पडल्याने दोघांचा मृत्यु तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना 23 जून रोजी दु . १ वा पळशी ( झाशी ) शिवारात घडली . यात संजय उत्तम मारोडे वय ४८ रवि संजय भालतिडक वय ३० या दोन अल्प भुधारक शेतक ऱ्यांचा जागीच मृत्यु झाला तर मंगेश मनोहर बारब्दे व नंदु मनोहर मारोडे हे दोघे गंभीर जखमी झाले असुन त्यांचेवर शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उपचार सुरु आहेत
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील संजय उत्तम मारोडे वय ४८ रवि संजय भालतिडक वय ३० मंगेश मनोहर बारब्दे व नंदु मनोहर मारोडे हे दोन शेतकरी घरची शेती करत क्रेनद्वारे विहीरी खोदण्याचे काम मजुरी म्हणन करत होते . 23 जून रोजी पळशी येथील शुभम हेलगे या शेतकर्याचे शेतात विहीर खोदण्याचे काम करत असतांना पाऊस सुरु झाला आश्रय घेण्यासाठी हे जवळच असलेल्या निंबाचे झाडाखाली गेले . ज्या झाडा खाली उभे होते त्याच झाडावर वीज पडल्याने संजय उत्तम मारोडे वय ४८ रवि संजय भालतिडक वय ३० शेतकऱ्यांचा जागीच मृत्यु झाला तर मृतक दोघेही शेतकरी अल्प भुधारक शेतकरी असून क्रेनने इतर शेतकऱ्यांच्या विहीरी खोदुन देण्याचे काम करत होते . हेच काम करत असतांना ही दुर्देवी घटना घडली . तर विहीरी जवळ पडून असलेले कपडे ओले होऊ नये म्हणुन मंगेश मनोहर बारब्दे व नंदु मनोहर मारोडे हे दोघे जण विहीरी जवळ गेले होते त्याच क्षणाला विज पडली म्हणुन ते सुदैवाने बचावले . मात्र या घटनेत हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व तलाठी यांनी घटना स्थळावर येऊन पंचनामा केला . तर प्रेताची उतरीय तपासणी सुरु होती . घटनेने तालुका भर हळहळ व्यक्त होत आहे . मृतक दोघेही विवाहीत असुन त्यांना लहान मुले आहेत या आपदग्रस्त कुटुंबांना शासनाने लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच अभय सिंह मारोडे यांनी केली आहे .
परीसर हादरवुन टाकणारी एवढी मोठी दुर्घटना घडली असतांना घटना स्थळावर एकाही जबाबदार अधिकार्याने भेट देऊन पाहणी करून सांत्वन केले नाही . मृतकाचे प्रेत वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर टायर रोड असल्याने महसुल विभागाचे अधिकारी वरवट ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी आले . औपचारीकता म्हणुन चौकशी करून परत गेले . वास्तवीक अशी विदारक घटना घडल्या वर या अधिकाऱ्यांनी तात्काळ तेथे पोहोचणे आवश्यक असतांना एकही अधिकारी घटना स्थळावर न आल्याने गावकऱ्यांनी महसुल प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त केला .