-बुलढाणा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची निवडणूक संपन्न; आजी-माजी पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती
हिवरा आश्रम (अरुणा म्हस्के) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना डीएनए १३६, बुलढाणा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची निवडणूक २० सप्टेंबर रोजी ग्रामसेवक पतसंस्था, बुलढाणा कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय काळे, तर जिल्हा सरचिटणीसपदी प्रदीप शिंदे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या निवडणुकीचे कामकाज अकोला जिल्हाध्यक्ष तथा राज्य निरीक्षक रविभाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. अकोला जिल्हा सरचिटणीस महेंद्र बोचरे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जामोदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल चव्हाण आणि सुनील हिवाळे यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली.
आजी-माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी मानद अध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव बुरकुल, राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा माजी जिल्हा सरचिटणीस देवेंद्र बरडे, सुभाषराव दुबे, संग्रामपूर तालुका अध्यक्ष तथा माजी सोसायटी अध्यक्ष दिलीपराव चेके, उद्धवराव गायकवाड, सुधीर ढोले, सिंदखेडराजा अध्यक्ष कैलास झिने, लोणार अध्यक्ष नंदकिशोर तेजनकर, मेहकर सचिव शेषराव शिंदे, लोणार सचिव गजानन लहाने, सिंदखेडराजा सचिव गणेश मेहेत्रे आदी उपस्थित होते. दत्तात्रय काळे यांना तालुका अध्यक्षपदाचा अनुभव असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. प्रत्येकाला सहकार्य करण्याची भूमिका आणि प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत हे त्यांच्या यशामागील कारण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रदीप शिंदे यांच्याकडेही तालुका अध्यक्षपदाचा अनुभव आहे. त्यांचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत सहकार्याचे संबंध असून, संघटनेच्या कामकाजात त्यांचे योगदान राहिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.