– समाजातून दानशुरांनी अनाथ मुलांच्या सहाय्यासाठी पुढे यावे – पीएसआय ब्राम्हणे
मेहकर (अमर राऊत) – पोलिस अधिकार्यातील संवेदनशीलता आज पुन्हा एकदा दिसून आली. मेहकर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सम्राट ब्राम्हणे यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साब्रा येथील अनाथ आश्रमात साजरा तर केलाच, पण दहा हजार रूपयांची देणगीही दिली.
सविस्तर असे, की सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मेहकर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सम्राट भीमराव ब्राम्हणे व त्यांच्या सुविद्य पत्नी पूनम सम्राट ब्राम्हणे यांनी त्यांचे चिरंजीव शौर्य याच्या वाढदिवसानिमित्त मेहकर तालुक्यातील साब्रा येथील अनाथ आश्रम येथे अन्नदान करून वाढदिवस साजरा केला. तसेच फुल नाही फुलाची पाकळी म्हणून अनाथ मुलांना मदत म्हणून श्री खंडे राज महाराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था साबरा अनाथ आश्रम तालुका मेहकर यांना १० हजार रुपयांची देणगी दिली. अनाथ आश्रमामध्ये फार गरीब मुले-मुली आहेत. सर्वांनी जर कमीत कमी अन्नदान करून समाजकार्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना केले आहे.