– माजी सैनिक तुकाराम उगलमुगले यांच्या अमृत महोत्सवात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आजची पिढी सुशिक्षित झाली की आपला संसार आणि यातच गुरफटून जाते. परंतु, उगलमुगले परिवाराने संसारात गुरफटून न जाता आई-वडिलांची सेवा करीत, समाजाभिमुख कार्य करीत, जागदरी गावाचे नाव आणि शंकरबाबा संस्थानचे नाव जिल्ह्याच्या कानाकोपर्यात नेऊन पोहोचविले. आज सेवानिवृत्त माजी सैनिक तुकारामजी उगलमुगले यांच्या अमृत महोत्सव साजरा करताना खरोखरच उगलमुगले परिवाराला भाग्य लाभले आहे. आमच्या नशिबात कदाचित ते नसावे, असे बोलताना आमदार मनोज कायंदे यांना गहिवरून आले.
जागदरी येथील सेवानिवृत्त माजी सैनिक तुकारामजी उगलमुगले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोज कायंदे हे होते. त्यांच्याहस्ते माजी सैनिक तुकारामजी उगलमुगले यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांचाही सत्कार उगलमुगले परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी केंद्रप्रमुख नंदाजी सानप, सेवानिवृत्त शिक्षक शंकरराव काळे, एकनाथ गवई, भगवान गायकवाड, भानुदास जायभाये, पुंजाजी डोईफोडे, निळकंठ कुलथे, आव्हाळे सर, प्रकाश वाघ, सुभाष वारे, भगवान गावडे, पांडुरंग सोनुने, हभप. वाघ गुरुजी, रामदास वायाळ, कारभारी सानप, सेवानिवृत्त शिक्षका वैजंतीताई मिसाळ, प्रा. गोविंद केंद्रे, छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेविका विमलताई केंद्रे, किसन गवई, सीताराम नागरे, प्रकाश नागरे, लंका मुंढे, विश्वनाथ कंकाळ, जानकिराम तुपकर, लक्ष्मणराव वाघ, हभप देविदास महाराज घुगे, सा ना तुपकर, रुपराव तुपकर, अशोक मुंढे, विष्णू शिंगणे, हिम्मतराव जाधव, कमलबाई जाधव, व्दारकाबाई पोंधे, विठ्ठलराव भालेराव, विनायक गायकवाड, रंगनाथ गावडे या सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तर ब्रेकिंग महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार अशोक इंगळे, पत्रकार भगवान सावळे, प्रल्हाद देशमुख, शेख नईम यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. डॉ.दशरथ शिंदे यांनी सीझर न करता अत्यंत नियोजनबद्ध ३५ हजार महिलांची प्रसुती केली, त्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
आज ज्ञानाचा दिवा लावणार्या शिक्षकांचा सत्कार करताना पुढील शिक्षकांनी यांचा आदर्श घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करावे, असे मनोगत वैजयंतीताई मिसाळ यांनी व्यक्त केले. तर डॉ. दशरथ शिंदे म्हणाले की, आजपर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु आज माझा गुरुजनांच्या उपस्थितीत जो सत्कार करण्यात आला तो सर्वांत मोठा पुरस्कार समजतो. यावेळी हभप. वाघ गुरुजी, भानुदास जायभाये यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. काल, दि. २३ जानेवारी रोजी अमृत महोत्सव वर्षानिमित्त तुकाराम उगलमुगले यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप उगलमुगले यांनी केले, तर आभार शंकरराव उगलमुगले यांनी मानले.