बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतभरच नव्हेतर जगभर गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४व्या सीझनमध्ये शुक्रवार, १४ ऑक्टोबररोजी रात्री ९ वाजता बुलढाणा माहेर व चिखली सासर असणार्या सौ.वैदेही अविनाश असोलकर या दिसणार आहेत. ज्या नऊ स्पर्धकांची ‘फास्टेस्ट फिंगर’साठी ‘प्ले अलाँग’गटातून निवड झाली आहे, त्यात वैदेही यांचा समावेश होणे, ही बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
सौ.वेदेही असोलकर या दोन वर्षापासून ‘कौन बनेगा करोडपती’साठी प्रयत्न करत होत्या. त्या चिखली येथील चैतन्य गुरुकुल येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘केबीसी’च्या सेटपर्यंत पोहोचणे, अमिताभ बच्चन यांना भेटता येणे व त्या भव्य स्टेज अन् कार्यक्रमाचा हिस्सा होणे, हा अद्भूत अनुभव असल्याचे सौ.वैदेही असोलकर यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.