हिवरा आश्रम, ता.मेहकर (समाधान म्हस्के) – नेपाळ येथे १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित एशियन शूटिंग बॉल अजिंक्यपद स्पर्धेत पांढरदेव येथील तथा महिला आघाडीच्या शिवसेना जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांची कन्या कु. गौरी गजानन म्हस्के हिची भारतीय महिला संघात निवड झाली आहे. विदर्भ शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव शकिलौद्दीन काजी आणि प्रशिक्षक शरद खाजभागे यांनी तिच्या या निवडीसाठी यशस्वी परिश्रम घेतले.
सदर निवडीबद्दल केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी कु. गौरीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कु.गौरी म्हस्के ही अमर विद्यालय अमडापूरची विद्यार्थिनी आहे. तालुका व जिल्हास्तरावर खेळलेली आहे. तिने १२ नॅशनल स्पर्धेमध्ये विजय संपादन केला आहे. आता तिचे भारतीय संघामध्ये राज्यातून पहिली निवड झाली असून, तिचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.